भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण

 2 जानेवारी रोजी मुलाखतीस हजर रहावे


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापूर :    भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुतींसाठी दिनांक 8 ते 17 जानेवारी 2024 या कालावधीत SSB कोर्स क्र. 56 छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या मोफत प्रशिक्षणासाठी दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे मुलाखतीस हजर रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  ले. कर्नल राहुल माने (निवृत्त) यांनी केले आहे.

 कोर्स कालावधील प्रशिक्षणार्थीना नि:शुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाणार आहे. मुलाखतीस येताना Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील SSB-५६ कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत आणायचे आहे. एस. एस. बी. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षणाला येताना सोबत घेवून यायचे आहे.

कंम्बाईड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी 'C' सर्टिफिकेट 'A' किंवा 'B' ग्रेड मध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस. एस. बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. व विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हॉटसअप् क्र. 9156073306 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  ले. कर्नल राहुल माने (निवृत्त) यांनी केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post