18 डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिवस निमित्त आयोजित*कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे - सहायक आयुक्त सचिन साळे

 

                 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

            कोल्हापूर : अल्प संख्याक विकास विभागाच्या शासन परिपत्रकानुसार 18 डिसेंबर 2023 हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करावयाचा आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 18 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वा. महाराणी ताराबाई सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात येणार आहे.

 कार्यक्रमामध्ये अल्पसंख्यांक संस्थेचे प्रतिनिधी व अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी यांचे मनोगत तसेच जिल्हा व्यवस्थापक, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ, कोल्हापूर यांचे मार्गदर्शन व अल्पसंख्यांक हक्क दिन योजना अंमलबजावणी सहभागबाबत चर्चा इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत-जास्त नागरिकांनी  या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन अल्पसंख्यांक हक्क दिवस समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आ

Post a Comment

Previous Post Next Post