सोमवारी पुईखडी वरून पाणी पुरवठा बंद
प्रेस मीडिया लाईव्ह :
संभाजी चौगुले :
कोल्हापूर ता.09 : पुईखडी येथील 110 केव्ही सबस्टेशन दुरुस्ती कामाकरीता महावितरण कडून विद्यूत पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरीकांना दैनंदिन होणारा पाणी पुरवठा सोमवार, दि.11 डिसेंबर 2023 रोजी होऊ शकणार नाही. तसेच मंगळवार दि.12 डिसेंबर 2023 रोजी होणारा पाणी पुरवठा अपूरा व कमी दाबाने होणार आहे.
यामध्ये ए, बी, वॉर्ड अंतर्गत पाण्याचा खजिना वितरण शाखा, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, मंगेशकर नगर, मिरजकर तिकटी, भारत डेअरी, संभाजीनगर, मंडलिक वसाहत, तिकोणे गॅरेज, किर्ती हौसिंग सोसा, कोळेकर तिकटी, पोतणीस बोळ, शाहू बँक परिसर, कोष्टी गल्ली, प्रॅक्टीस क्लब, वारे वसाहत, साळोखेनगर, बापु रामनगर, महाराष्ट्र नगर, सुर्वेनगर, प्रथमेश नगर, शिवगंगा कॉलनी, प्राध्यापक कॉलनी, वाल्मिकी आंबेडकर नगर, राधे कॉलनी, शांती उद्यान, इंगवलेमळा, आई कॉलनी, कात्यायणी कॉम्प्लेक्स, राजीव गांधी, जरगनगर, गंजीमाळ, रामानंदनगर, नाळे कॉलनी, विजयनगर, जुनी मोरे कॉलनी, नवी मोरे कॉलनी, वर्षानगर, भारतनगर, सुभाष नगर पंपींग वरील ग्रामीण भाग, पाचगाव, आर.के.नगर, पुईखडी, जिवबा नाना, विशालनगर, आयसोलेशन, वाय.पी.पोवार नगर, वर्षा विश्वास परिसर, शिवस्वरूप कॉलनी, पोस्टल कॉलनी, आर.के.नगर, जरगनगर ले आऊट तसेच ई वॉर्ड अंतर्गत संपूर्ण राजारामपुरी, शाहू मिल, वैभव हौसिंग सोसायटी, ग्रीनपार्क, शांतीनिकेतन, रेव्हेन्यु कॉलनी, अरूणोदय परिसर, राजेंद्रनगर, चौगुले हायस्कुल परिसर, सम्राट नगर, प्रतिभानगर, इंगळेनगर, दौलतनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, पांजरपोळ, नवश्या मारुती चौक, दत्तगल्ली, यादवनगर, कामगार चाळ, पंत मंदीर परिसर, जगदाळे कॉलनी, महावीरनगर, अश्विनीनगर, जागृतीनगर, पायमल वसाहत, अंबाई डीफेन्स, राजाराम रायफल, काटकर माळ, लोणार वसाहत, शाहू मिल कॉलनी, राजीव गांधी वसाहत, महाडिक वसाहत, रुईकर कॉलनी, लिशा हॉटेल, शिवाजी पार्क, फ्रेंड्स कॉलनी, शाहुपुरी व्यापारपेठ, शाहुपूरी 1 ते 4 गल्ली, साईक्स एक्स्टेन्शन, पाच बंगला परिसर इत्यादी भागातील नागीकांना दैनंदिन होणारा पाणी पुरवठा होऊ शकणार नाही तरी संबंधीत भागातील नागरीकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे