प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिद्धार्थ नगर येथून कॅन्डल मार्च करण्यात आला समृद्धी महिला सामाजिक संस्था अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सिद्धार्थ नगर कोल्हापूर यांचे वतीने या कॅडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते,
यावेळी लहान मुले तसेच पहिला यांचा लक्षणीय सहभाग होता प्रथम सिध्दार्थ नगर बुध्द विहार येथे महामानव भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना, अभिवादन करून,दिप प्रज्वलीत केले, तेथून,दसरा चौक येथे छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन केले , तेथून लक्ष्मीपुरी मार्गे ऐतिहासिक बिंदू चौक येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले तसेच बुद्ध वंदना ही घेण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सामाजिक कार्यकर्ता स्वाती काळे यांच्या माध्यमातून करण्यात आले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी , संगीता बनगे,सीमा कांबळे,संगीता माने ,अश्विनी कांबळे, रेखा कांबळे पौर्णिमा कांबळे गायत्री शिरोलीकर आरती काळे सुषमा ठाणेकर लता तामगावकर, उज्वला चौगुले संगिता कांबळे,नर्मता कांबळे,इत्यादी महिलांचे विशेष सहकार्य लाभले*