कोल्हापुरात बिंदू चौकातून दिव्यांग दिन रॅलीचा प्रारंभ

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दाखविला हिरवा झेंडा


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

               कोल्हापूर  : रविवार दि. ३ डिसेंबर, जागतिक दिव्यांग दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने दिव्यांग सांस्कृतिक सोहळा - २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे.  या सोहळ्याची सुरुवात सकाळी 8 वाजता महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाली. कोल्हापुरातील विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झालेली ही रॅली बिंदू चौकातून अयोध्या  टॉकीजमार्गे दसरा चौकापर्यंत पोहोचली. कोल्हापुरातील बिंदू चौकामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.               

 यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव,  जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार, जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता साधना कांबळे, जिल्हा समाज कल्याण निरीक्षक सदानंद बगाडे व सहाय्यक लेखा अधिकारी संदीप खारगे आदी उपस्थित होते. यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांगांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

               

देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे या म्हणी प्रमाणे दिव्यांग बांधवांसाठी योजना व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले. यावेळी ते म्हणाले की दिव्यांग यांच्या आयुष्यामध्ये उज्वल पहाट यावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना शासकीय अधिकाऱ्यांनी पोहोचाव्यात तसेच यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यांनी केले. माता पिता कुटुंब आणि समाज यांनी दिव्यांग बाबतचा गैरसमज दूर करून दिव्यांगानाही आपल्या मध्ये सामील करून घ्यावे त्यांच्या सुखदुःखात मदत करावी, असे श्री. पाटील म्हणाले.

          

   जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी विशेष शाळा व कर्मशाळा मधील विद्यार्र्थ्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला, रांगोळी स्पर्धा व मुलांनी तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन व विक्री आणि भव्य सांस्कृतिक कार्यक्रमा श्री मंगल कार्यालय, बावडा-शिये रोड येथे आयोजन करण्यात आले. यावेळी दिव्यांगाना व्हील चेअर व सायकल चे वाटप करण्यात आले. 


Post a Comment

Previous Post Next Post