विकसित भारत संकल्प यात्रेचे गुरुवारी 24 ठिकाणी कार्यक्रम

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : विकसित भारत संकल्प यात्रेचे 14 डिसेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 24 ठिकाणी सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली आहे. 

दि.14 डिसेंबर 2023 रोजी सकाळी चंदगड तालुक्यातील घुलेवाडी, गगनबावडा तालुक्यातील मंदूर, शिरोळ तालुक्यातील अगर, कागल तालुक्यातील बेनिक्रे, राधानगरी तालुक्यातील करंजफेण, करवीर तालुक्यातील कांचनवाडी, गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी, आजरा तालुक्यातील कितवडे, भुदरगड तालुक्यातील वेसर्डे, शाहुवाडी तालुक्यातील कांदवण, हातकणंगले तालुक्यातील माणगाव व पन्हाळा तालुक्यातील निवडे या गावांमध्ये सकाळच्या सत्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हातकणंगले तालुक्यातील माणगांववाडी, चंदगड तालुक्यातील निट्टुर, गडहिंग्लज तालुक्यातील कुंबळहळ, गगनबावडा तालुक्यातील मर्गेवाडी, राधानगरी तालुक्यातील गुडाळ, आजरा तालुक्यातील सुळेरान, शाहुवाडी तालुक्यातील उदगिरी, भुदरगड तालुक्यातील कारीवडे, शिरोळ तालुक्यातील चिंचवड, कागल तालुक्यातील आलाबाद, करवीर तालुक्यातील पाटेकरवाडी व पन्हाळा तालुक्यातील उंद्री या गावांमध्ये त्याच दिवशी दुपारच्या सत्रात  कार्यक्रम होणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post