दानम्मा देवी यात्रा व कार्तिक दीपोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

सालाबाद प्रमाणे याही वर्षी खोतवाडी गौरीशंकर नगर येथे  दानम्मा देवी ची यात्रा व दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पहाटे 5.30 वाजता महा अभिषेक सौ.व श्री. उमाकांत कोळकी,  सौ.व श्री. चंद्रकांत चौगुले,  सौ. व श्री. दत्तात्रय स्वामी,  सौ.व श्री. ईश्वर कराडकर  सौ.व श्री. संजय मुरतले या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते महा अभिषेक संपन्न झाला.  

यानंतर 11.30 वाजता दानेश्वरी महिला मंडळाच्या वतीने आलेल्या सर्व दोन ते अडीच हजार महिला सुवासिनींना त्यांची ओटी भरून सुवासिनी पूजन करून महाआरती करण्यात आली याप्रसंगी माझी नगरसेवक पाणीपुरवठा सभापती सौ व श्री संजय तेलनाडे महाआरतीसाठी उपस्थित होते. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता  प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सौ.व श्री. संजय तेलनाडे तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय श्री डॉक्टर राहुल आवाडे व वीरशैव उत्कर्ष मंडळाचे सेक्रेटरी किशोर पाटील यांच्या शुभहस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या वेळेला सहा ते सात हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

सायंकाळी 6.00 वाजता पालखी सोहळा व महाआरती व दीपोत्सव कार्यक्रम संपन्न झाला पालखीचे पूजन सौ.व श्री तुकाराम मेटगुडे (कारखानदार) यांच्या शुभहस्ते करण्यात आले यानंतर महाआरती साठी ग्रामपंचायत सदस्य गजानन नलगे यांच्या शुभहस्ते आणि दीपोत्सव साठी प्रमुख पाहुणे युवा नेतृत्व उद्योजक श्री संग्राम अशोक स्वामी व परिसरातील सर्व नागरिक, समाजातील सर्व बंधू- भगिनी दानम्मा देवीचे सर्व भक्त या सर्वच्या शुभहस्ते दीपोत्सव चा कार्यक्रम संपन्न झाला. दिवसभरामध्ये दानम्मा देवीच्या यात्रे निमित्य दहा ते बारा हजार भक्तांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी वीरशैव लिंगायत नागलिक (बणगार) उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच दानेश्वरी महिला मंडळाचे अध्यक्ष्या व सर्व पदाधिकारी मंदिर कमिटीचे सर्व पदाधिकारी युवक मंडळाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच खोतवाडी ग्रामपंचायतचे आजी /माजी सरपंच व उपसरपंच व सर्व आजी /माजी ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.

Post a Comment

Previous Post Next Post