प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- शिरोली नाका येथे असलेल्या ए.एस.लॉन येथे सोमवारी लग्नाचा स्वागत समारंभ आयोजित केला होता.तेथे समारंभ चालू असताना यावेळी चोरट्यांने 15 लाखांचे सोन्याचे दागिने असणारी पर्स लंपास करून पोबारा केला.
या प्रकरणी केतन विरेंद्र नंदेशवन (वय 36 रा बेळगाव) यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात रात्री दहाच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक माहिती अशी की,सोमवारी रात्री शिरोली नाका परिसरात असलेल्या लॉन मध्ये केतन यांच्या मामेभावाचा लग्ना निमीत्त स्वागतसमारंभ आयोजित केला होता.
हा कार्यक्रम चालू असताना केतन यांच्या मातोश्री मीना यांनी सोन्याचे दागिने असलेली पर्स आपल्या पाया जवळ ठेवून बोलत बसल्या होत्या.त्या वेळी चोरट्यांने काही अवधीतच ही पर्स लंपास करून तेथुन पोबारा केला.यात साडेसात तोळ्याचा सोन्याचा मोठा हार ,पाच तोळ्याचा सोन्याचा हार ,तीन तोळ्याचे मंगलसुत्र,सहा तोळ्याच्या बांगड्या ,पाच तोळ्याचे तोडे ,बाजुबंद,कानातील रिंगा ,पेंडल चेन तसेच आठ हजार रुपये रोख आणि मोबाईल असा ऐवज पर्स मध्ये होता.याची अंदाजे किंमंत 15 लाख 80हजार रुपये किमंतीचा मुद्देमालाची चोरी झाली आहे.या प्रकरणी पोलिस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.