प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-रिंग रोड येथे फुलेवाडी परिसरातील सुषमा सुरज दळवी (वय 25) या विवाहितेने बेडरुम मधील पंख्याच्या हुकाला गळफास लावून आत्महत्या केली.हा प्रकार गुरुवारी सकाळी त्यांच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आला.तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल करण्यात असता सुषमा हिचा उपचारापूर्वी मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले .
सुषमा हिचा सहा महिन्या पूर्वी मे 2023 रोजी कागल येथील सुरज दळवी याच्याशी विवाह झाला होता.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.सुषमा सात आठ दिवसापूर्वी माहेरी आली होती.तिच्या अशा मृत्यु मुळे तिच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली असून पुढ़ील तपास पोलिस करीत आहेत.