किरकोळ कारणातुन मित्राने केला मित्राचा खून.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे:

कोल्हापुर-शहरात मध्यवर्ती एसटी स्टँड परिसरात झालेल्या वादातुन मित्रानेच मित्राने सोडा वॉटरच्या बाटल्या डोक्यात फोडुन खून केला .ही घटना रात्रीच्या घडली आहे.खून झालेल्याचे नाव विनायक विशाल लोंढ़े (वय 32रा.सदरबाजार )असे असून संशयीताचे नाव समीर युनुस मणेर (32 कदमवाडी) त्याचे नाव आहे.

याला शाहुपुरी पोलिसांनी अटक केली असून यांच्या विरुध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विनायक लोढ़े हा मोलमजुरी करून पोट भरत होता.हे दोघेही दारुच्या नशेत होते.त्यांच्यात मोबाईलच्या कारणातून वादावादी सुरु होऊन संशयीत मणेर याने शेजारी असलेल्या गाडीवरील सोडा आणि बिअरची बाटली मारुन खून केला.त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले .

या घटनेनंतर शाहुपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर आपल्या सहकारयांसह दाखल झाले.त्यांनी संशयीला अटक केली असून त्याने खून केल्याची कबुली दिली.पुढ़ील तपास  पोलिस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post