प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- मणेरमळा (उचगांव) येथे नियमाचा भंग केल्या प्रकरणी लकी व्हिडीओ गेम पार्लरवर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या पोलिसांनी छापा टाकून तिघांच्या विरोधात कारवाई करुन 2 लाख 89 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी जिल्हयात सुरु असलेल्या अवैध व्यवसाय चालू असलेल्यावर संबंधितांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मणेरमळा (उचगाव) येथे लकी व्हिडिओ गेम पार्लर असून त्या ठिकाणी मशीन्स मध्ये फेरफार करून नियंमाचा भंग करत चालू असल्याची माहिती मिळाली असता त्या ठिकाणी छापा टाकून अविनाश जनार्दन मोळे (रा.शिंदे कॉलनी,उचगाव) समीर गुलाब चित्तेवान (रा.कोल्हापूर) आणि साहिल सुनिल देसाई (वय 21.रा.शिंदे कॉलनी,उचगाव) या तिघांच्यावर गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करून त्याच्या कडील 14 मशीन्स व 9 हजार 700 रुपये रोख रक्कमेसह एकूण 2 लाख 89 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र करमळकर ,सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.