क्राइम न्यूज : कंळबा येथे युवकाचा पाठलाग करून तलवारीने खुनी हल्ला.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर-कंळबा येथे साई मंदीर चौकात आपल्या विरोधातल्या सोबत का फिरतोस म्हणुन सौरभ  संजय साळुंखे (वय 23 रा .मोरेवाडी रोड,राजेंद्रनगर) याचा पाठलाग करून त्याच्यावर तलवारीने खुनी हल्ला केला त्यात तो जखमी झाला.त्याच्या हाताचे मनगट अर्धवट तुटले असून या प्रकरणी त्र्यंंबक गवळी याच्यासह तिघांच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौरभ साळुंखे हा रेशन दुकान चालवित आहे.तपोवन येथे कृषी प्रदर्शन पहायला रविवारी गेला होता.तेथुन घरी जात असताना साई मंदीर चौकात तिघां जणांनी रस्त्यात अडवून तू आपला विरोधक रवि भोसले आणि साहिल मणेर यांच्या समवेत का फिरतोस असे म्हणत त्र्यंबक गवळी,अमित गवळी आणि सुमित गवळी यांनी सौरभवर तलवार आणि ऐडका याचा वापर करून त्याच्यावर हल्ला चढवला सौरभने पहिला वार हाताच्या पंजावर झेलला आणि त्यानंतर पळत सुटला या तिघांनी त्याचा पाठलाग करत त्याच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो वार आडवा हात घातल्याने मनगट अर्धवट तुटले.तसाच जिवाच्या आकांताने मोठ्याने ओरडत असल्याने हल्लेखोर पळून गेले.जखमी अवस्थेत सौरभला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथुन खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्याने या बाबतची जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तिघां जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा खुनी हल्ला पूर्ववैमनस्यातुन झाल्याचा पोलिसांनी प्राथमिक तपासात स्पष्ट केले असून पोलिस पुढ़ील तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post