प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - पन्हाळा तालुक्यातिल शहापूर येथे घरफोडी करून पसार झालेला इब्राहिम अली शेख या चोरट्यास अटक करून त्याच्या कडील चोरीस गेलेला सोन्या चांदीच्या दागिन्यासह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
अधिक माहिती अशी की,पन्हाळा तालुक्यातिल शहापूर येथील कृष्णात पाटील यांच्या घरी 18 नोव्हेंबर 23 रोजी चोरी झाली होती.याबाबतची माहिती कोडोली पोलिस ठाण्यात दिली होती.या गुन्हयाचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला घरफोडी करणारा चोरटा काखे गावच्या परिसरात येणार असल्याचे समजले वरून पोलिसांनी तेथे सापळा रचून शेख याला अटक करून त्याच्या कडील चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला.