प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-जादा परतावा देतो असे सांगून एकूण 26 जणांची एक कोटी अकरा लाख 6 हजार पाचशे रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी गोल्ड़ लाईफ डिस्ट्रीब्युटर्स कंपनीचा मुख्य सूत्रधारासह नऊ जणांवर सोमवारी रात्री राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याची तक्रार विजया दिपक कांबळे (वय 43 रा.सरनोबतवाडी ). यानी फिर्याद दिली होती. यातील या कंपनीचा मुख्य सुत्रधार इंद्रजित सुभाष कदम (वय 46 रा.प्रतिभानगर ) हा एका राजकीय कार्यकर्ता असलेला यांचा जवळचा नातेवाईक असून याच्यासह राहुल शशिकांत गाडवे , (52.राजारामपुरी). जिएसटी अधिकारी कुमार जोतिराम उबाळे (52.राजेंद्रनगर ),अमरदिप कुंडले (49 .राजगड कॉलनी) बाबसो वाडकर (मणेरमळा),अशा पाच जणांना आर्थिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने अटक केली.अतुल वाघ (रा.देवकर पाण्ंद),शैलेश वाघ (रा.फुलेवाडी),शैलेश मरगज (शिवाजी पेठ),आणि सुनिता आबासो वाडकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या नऊ जणांनी ऑगस्ट 22 पासून गुंतवणूकदारांच्या कडून प्रत्येक महिन्याला पाच टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून पैसे भरून घेतले होते.सुरुवातीला काही महिने परतावा दिल्या नंतर मार्च 23 पासून परतावा देण्याचे बंद केले.यामुळे यातील गुंतवणूकदारांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती.या तक्रारीनुसार आर्थिक गुन्हा अन्वेशनच्या पथकाने चौकशी करून यातील नऊ जणांवर गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.