प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - क.बावडा परिसरात असलेल्या कोंडाळ्यात स्त्री जातीचे अर्भक महानगरपालिकेच्या स्वच्छता करण्यारया दिसून आले.त्यांनी तात्काळ आपल्या वरिष्ठांना आणि शाहुपुरी पोलिसांना माहिती दिली.सापडलेल्या अर्भकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेने नागरिकांच्यात संतप्त भावना व्यक्त केल्या जात होत्या.आज सकाळी त्या परिसरात स्वच्छता करीत असताना येथे असलेल्या कोंडाळ्यात स्त्री जातीचे अर्भक दिसून आले.या कर्मचारयांनी याची माहिती आपल्या वरिष्ठांना देत या अर्भकाला तेथे असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.पण तेथील डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार रुग्णवाहिकेतुन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान त्या अर्भकाची प्रकृती स्थीर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.या घटनेची माहिती शाहुपुरी पोलिसांना समजताच पोलिस उपनिरीक्षक बागल घटना स्थळी जाऊन या कर्मचारी आणि नागरिकांच्या कडुन माहिती घेऊन शाहुपुरी पोलिस पुढ़ील तपास करीत आहेत.