प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर जाधव :
कोल्हापूर : शासकीय कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेंशनसंदर्भात अडचणींच्या निराकरणासाठी उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांच्याकडे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या किंवा तिसऱ्या शनिवारी पेंशन लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या पेंशनसंदर्भात काही अडचणी असल्यास त्यासाठी पेंशन लोक अदालतीमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रीतम पाटील यांनी केले.
विधी व सेवा प्राधिकरण कार्यालयात आयोजित पेंशन लोकअदालत संदर्भात बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, तहसिलदार (सर्वसाधारण) जयंत पाटील, लेखाधिकारी अनिकेत गावडे, सार्थक कोळेकर, दत्तात्रय पाटील, सय्यम बोटे, उपकोषागार अधिकारी संजना वाडेकर, सुशांत लाड उपस्थित होते.