प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - टाऊन हॉल परिसरात नवीन एस.टी.स्थानक बांधण्यास निधी शिल्लक नाही .तेव्हा स्पॉन्सर आणून नवीन एसटी बस स्थानक बांधा .असे एसटीच्या संबंधित अधिकारी यांनी सांगितले.गेल्या पाच-सहा महिन्यापूर्वी टाऊन हॉल परिसरात असलेले एसटी बस स्थानक संबंधित विभागाने पाडले असून पर्यायी व्यवस्था प्रवाशांची न करता याकडे दुर्लक्ष होत आहे.
प्रवाशांना तसेच वयोवृध्दाना बसण्यास अगर उभारण्यास कोणतीही सोय केलेली नाही.पावसाळा संपला तरी एसटीचे संबंधित विभागाला लक्ष द्यायला वेळ नाही.या बस स्टॉप परिसरात प्रवासी ताटकळत उभे राहतात.प्रत्येक येणारी एसटी बसला थांबवण्यासाठी धावपळ करावी लागते.या मुळे असख्य्ं प्रवाशांना उंन्हातान्हात,पावसापान्हयात आणि थंडीत कुडकुडत उघड्यावर उभे रहावे लागते.नाकातोंडात धुळीचे कण जाऊन आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.ही परिस्थिती येथील राजकीय नेते मंडळीना माहिती असून ही त्या कडे दुर्लक्ष केले जात आहे.ते कधीच स्वतःकिंवा त्यांचे कुंटुबिय एसटीने प्रवास करत नाहीत.
यां वेदना काय कळणार या स्टॉप वरुन नोकरदार वर्ग प्रवास करत असून ग्रामीण भागातील मुले मुली शिक्षणासाठी शहरात येत असतात.या एसटी बस स्थानकासाठी संबंधित विभागाकडे काही प्रवाशांनी पाठ पुरावा केला होता.तरी सुद्धा या विभागाने लक्ष दिले नाही.काही प्रवाशांनी या विभागाकडे अधिक चौकशी केली असता एसटीच्या संबंधित अधिकारी यांनी नवीन एसटी बस स्थानकास निधी उपलब्ध नसल्याचे सांगून तुम्ही स्पॉन्सर हुडकून बांधून घ्यावे.आमची कोणतीही अडचण नाही.असा लाख मोलाचा सल्ला दिला.