अखेर भिडेवाडा जमीन दोस्त झाला.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर-सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेने बुलडोझर फिरवून ऐतिहासिक असलेली वास्तु जमीन दोस्त केली.महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.या जागेवर आता राष्ट्रीय स्मारक होऊन सामाजिक क्रांतीचे प्रतिक होणार आहे.महत्वाचे म्हणजे भिडे वाड्यांचा भारतीय राज्यघटनेशी मोठा संबंध असल्याचे सांगितले जाते.महात्मा फुले यांनी मुलींसाठी 1848 च्या काळात पहिली शाळा चालू करून सावित्रीबाई फुले यांची पहिली शिक्षीका म्हणून नेमणूक केली.


आज मुलांच्या बरोबरीने महाराष्ट्रात मुलींना 'सावित्रीच्या लेकी ' म्हटले जाते.म्हणूनच या भिडेवाड्याला एऐतिहासिक महत्व दिले जाते.या ठिकाणी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व्हावे अशी सर्वांची इच्छा होती.याला राज्य शासनाचीही संमती होती.पण येथील काही व्यावसायिकांनी याला विरोध केला होता.शेवटी हा वाद न्यायालयात जाऊन वरील निर्णय होऊन.पुणे महापालिकेने रातोरात ही वास्तु जमीन दोस्त केली.भारतीय घटनेत एकूण 395 कलमे आहेत.ती 394 किंवा 396 कलमे का नाहीत असा काहींना प्रश्न पडला असेल महात्मा फुले यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे गुरु मानत होते.प्रथम मुलींच्या शिक्षणाची सामाजिक क्रांतीची ज्योत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी लावली होती.त्या भिडेवाड्याचा सिटी सर्व्हे नं.395 असल्यांने डॉ.आंबेडकरांनी 395 कलमात संविधान बंद करून महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली आहे.म्हणुनच या भिडेवाड्याला महत्व प्राप्त झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post