प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- सध्या काही जण ओएलएक्स वर जाहिरात बाजी करून मोबाईल विक्री करत असतात.याचाच फायदा घेऊन ओएलएक्स वर मोबाईल विकत घेण्याचा बहाणा करून फरारी असलेला आशिष दत्तात्रय गायकवाड याला सायबर पोलिसांनी अटक केली.
यापूर्वीच यातील स्वप्निल सुनिल गाडेकर याला शाहुपुरी पोलिसांनी अटक केली असून या दोघांच्या विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्या दिवसापासून स्वप्निल गायकवाड हा फरार होता.या दोघांच्या विरोधात शहापूर ,गांधीनगर आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अशा प्रकारच्या तक्रारी दाखल आहेत.सायबर पोलिसांनी पुढ़ील तपासा करीता शाहुपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.काही जणांची अशा प्रकारे फसवणूक झाली असल्यास नागरिकांनी कोल्हापुर येथील सायबर पोलिस ठाणे ,पोलिस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा (0231-2665975)आणि मो.नं.8412841100 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.