लोखंडी गेट अंगावर पडल्याने लहान मुलाचा मृत्यु.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर-  क.बावडा येथे आज दुपारी आपल्या घरासमोर खेळत असताना समोरील लोखंडी गेट अंगावर पडल्यांने श्रीधर अभिचिंतन अंबपकर (वय 8.रा.श्री.राम पेट्रोलपंपासमोर ,क.बावडा)याचा मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अधिक माहिती अशी की ,श्रीधर हा दुपारी चारच्या सुमारास आपल्या घरासमोर खेळत असताना त्याने समोर असलेल्या गेटला हात लावल्याने ते लोखंडी गेट त्याच्या अंगावर पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला.त्याला तात्काळ नागरिकांनी आणि त्याच्या आईने सरस्वती हॉस्पिल (APPLE ) दाखल केले तेथुन पुढ़ील उपचारा साठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचारा पूर्वीच श्रीधर मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

श्रीधरचा मृत्यु झाल्याचे कळताच तेथे काही काळ गोंधळ उडाला.श्रीधर हा सेंट झेवियर्स येथे दुसरीच्या वर्गात शिकत होता.कालच त्याच्या शाळेचे स्नेह संमेलन झाले  होते त्यात त्याने भाग ही घेतला होता.त्याला एक लहान बहीण असून त्याच्या वडीलांचे ताराबाई पार्क परिसरात किराणा मालाचे दुकान आहे.तो नेहमी वडीलांच्या बरोबर दुकानात जात असे पण आज तो गेला नाही.त्याचे आजोबा निवृत्त शिक्षक होते.श्रीधरच्या अशा निधनाने त्या परिसरात हळ हळ व्यक्त होत आहे.पुढ़ील तपास शाहुपुरी पोलिस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post