प्रेस मीडिया लाईव्ह :
संभाजी चौगुले :
कोल्हापूर : महापालिका क्षेत्रातील नगररचना विभागाकडे दाखल झालेल्या विकास परवानगी (इमारत बांधकाम व भोगवटा) कामी बुधवार व गुरुवार, दि.13 व 14 डिसेंबर 2023 रोजी नगररचना विभागामार्फत दोन दिवसाचे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
या कॅम्पमध्ये 1000 चौ.मी. भूखंड क्षेत्रापर्यंतची विकास प्रकरणे घेतली जाणार आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या सुचनेनुसार या दोन दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हा विशेष कॅम्प घेतला जाणार आहे. या कॅम्पमध्ये विविध प्रकारचे विकास परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, जोता चेकिंग, अनामत रक्कम परत, ले आऊट मंजूरी, एकत्रीकरण व विभाजनची कामे केली जाणार आहेत. तरी संबंधीतांनी सदरच्या कॅम्पमध्ये सहभागी होणेकरीता दि.13 व 14 डिसेंबर 2023 रोजी नगररचना विभाग, दुसरा मजला, बागल मार्केट, राजारामपुरी येथे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करून संबधीतांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा असे आवाहन नगररचना विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.