प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - कंळबा कारागृहात पोलिस रेकॉर्ड वरील दोघे गुंड बंदिस्त असून त्यांनी जेल मध्ये बसलेले काही व्हिडीओ तयार करून ते सोशल मिडीया वर व्हायरल केल्याने नागरिकांच्यात कंळबा जेलच्या सुरक्षे बद्दल चर्चेला उधाण आले होते.त्यामुळे या दोघांनी कंळबा जेलच्या सुरक्षेला भगदाड पाडल्याचे धाडस केले असल्याची चर्चा आहे.
हा व्हिडीओ सोशल मिडीया वर व्हायरल झाल्याने कंळबा जेलच्या प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधीतावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या अगोदर कंळबा कारागृहात मोबाईलचा वापर होत असल्याचे आढळले होते.त्याच बरोबर कंळबा जेल मध्ये गांजाची पाकिटे फेकताना मिळाली आहेत.त्याच बरोबर मोबाईलसह चार्जरही काही जणाच्याकडे मिळून आल्याच्या घटना घडल्या आहेत.कंळबा जेलची एवढी मोठी सभोवती सुरक्षा व्यवस्थेसह सीसीटीव्ही असून ही अशा प्रकारच्या घटना थांबल्याच्या दिसत नाहीत.तसेच बंदीजनाच्यात वरचेवर वाद होऊन होणारी हाणामारी सारख्या घटना घडल्या आहेत.त्यामुळेच कंळबा कारागृहाची सुरक्षा व्यवस्था बे भरोसे म्हणावी लागेल.