प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : नमो दिव्यांग शक्ती अभियाना अंतर्गत दिव्यांग पुनवर्सन केंद्र घोषित करण्यात येणार असून यासाठी जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्रधारकांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी केले आहे.
स्वयंसेवी संस्थानी प्रस्ताव सादर करताना दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 अंतर्गत संस्थेचे प्रमाणपत्र, दिव्यांग व्यक्तींसाठी विविध योजना उपक्रम राबविल्याचा अनुभव, संस्थेची स्वतःच्या नावे असलेली इमारत अथवा भाडे कराराने घेतलेली पुरेशी इमारत, ही इमारत अडथळामुक्त व सुगम्य असावी, समुपदेशन व थेरपीसाठी तज्ञ व्यक्ती तसेच आवश्यक व पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध असावे, कार्यरत असलेल्या संस्थेच्या बँक खात्याचा तपशील इ. कागदपत्रे जोडावीत. अधिक माहितीकरीता समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर (दुरध्वनी क्रमांक 0231-2950162) येथे संपर्क साधावा, असेही श्री. पोवार यांनी कळविले आहे.