प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित, कॉलेज ऑफ एज्युकेशन बीएड पेठ वडगाव येथे बीएड द्वितीय वर्षातील सेमिस्टर तीन मधील शालेय आंतरवासिता प्रात्यक्षिका अंतर्गत गट क्रमांक एक "लोकनेते राजारामबापू पाटील विद्यालय वशी "येथे दोन महिन्याची आंतरवासिता संपन्न झाली. ही आंतरसिता दिनांक ३/१०/२०२३ पासून सुरू करण्यात आली होती.
या आंतरवासते दरम्यान छात्राध्यापकांनी अध्ययनाबरोबर वेगवेगळे उपक्रम राबवले यामध्ये रांगोळी स्पर्धा ,पारंपारिक वेशभूषा स्पर्धा ,वृक्षारोपण, जागतिक शिक्षक दिन ,स्वच्छता मोहीम ,कवायत प्रकार, टपाल दिन ,आरोग्य तपासणी ,वाचन प्रेरणा दिन, चित्रकला स्पर्धा, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू ,इको ब्रिक्स ,क्रीडा स्पर्धा यासारखे उपक्रम राबवले. सोमवार दिनांक 4/ 12 /2013 रोजी अंतरवासितेचा सांगता समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सौ. निर्मळे आर. एल प्र. प्राचार्या कॉलेज ऑफ एज्युकेशन, बीएड पेठवडगाव तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री .मारुती अण्णा जाधव .सर अध्यक्ष /संस्थापक कै. वसंतदादा पाटील शिक्षण प्रसारक मंडळ हे होते. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा. श्री .पाटील जे. बी .उपाध्यक्ष कै. वसंतदादा पाटील शिक्षण प्रसारक मंडळ ,प्राध्यापक श्री. मुल्ला एस.एम. मुख्याध्यापक,श्री.नामदेव पांडुरंग देवकर माळी सरपंच कुरळप ,श्री.नागनाथ संपतराव पाटील, माजी विद्याथी
सौ.रेखा परशुराम साळुंखे, माजी विद्याथी लोकनेते राजारामबापू विद्यालय वशी उपस्थित होते. इतर उपस्थितीमध्ये विद्यालयाचे सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, अंतर्वासिता गटातील छात्र अध्यापक, छात्र अध्यापिका, विद्यार्थी ,विद्यार्थिनी उपस्थितीत होते .या गटाची शालेय आंतरवासिता हे प्रात्यक्षिक प्रा. श्री. सोरटे एस .के व डॉ. पवार ए. आर. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक छत्राध्यापिका सरस्वती चव्हाण तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका मयुरी पाटील व प्रतिक्षा पालकर यांनी केले. आंतरवासिता दरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेतील शिक्षकांनीही मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या डॉ निर्मळे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी मुलांना आपल्यातील सुप्त गुण ओळखून त्या गुणांना वाव द्या असे सांगितले. मोबाईलचे महत्व त्याचे फायदे तोटे मुलांना सांगितले तसेच अध्यक्षांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी स्वतःचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. नवनवीन गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. तसेच छात्राध्यापिका मानिनी जाधव व छात्राध्यापक प्रकाश माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी छात्राध्यापक सुरेश यादव यांनी आभार मानले.
अशा प्रकारे ही दोन महिन्याची अंतरवासिता टप्पा क्रमांक दोन अगदी व्यवस्थित रित्या पार पडली.