एसटी आणि मोटारसायकलच्या धडकेत एक ठार.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- निर्माण चौक परिसरात मोटारसायकल आणि एसटीची यांच्यात झालेल्या अपघातात जरगनगर येथे रहात असलेले विनायक बंळवंत खाडे (वय 65) हे जागीच ठार झाले.

काल सकाळी खाडे हे आपली दुचाकी घेऊन कामानिमित्त घराबाहेर पडले ते दुचाकीवरुन जात असताना कोल्हापूर गारगोटी एसटी येत असताना निर्माणचौकात एसटी आणि मोटारसायकलच्या झालेल्या धडकेत खाडे हे जागीच ठार झाले.या वेळी खाडेच्या पिशवीतील साहित्य रस्त्यावर पडलेले होते.ते एका खाजगी दुकानात कामाला होते.या अपघाताची नोंद पोलिस चौकित झाली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post