प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर/देवाळे-वारणानगर येथे गेल्या काही दिवसांपासून कृषी प्रदर्शन भरविले होते.ते पहाण्यासाठी देवाळे येथील सुरज रमेश जाधव (वय 21) हा घरी परत येत असताना त्या परिसरात असलेल्या कालव्यात मोटससायकल घसरुन झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
हा अपघात मंगळवारी रात्रीच्या सुमारास झाला असून तो बुध्दवारी उघडकीस आला.वारणा नगर हुन बोरपाडळे मार्गे रस्ता चांगला असताना सुरज अडवळणी मार्गाने कसा काय गेला याची गावात कुणकुण चालू आहे.या मार्गावर अपघाताची घटना घडल्याने गावात दबक्या आवाजात घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे.पोलिसांना या अपघाताची माहिती समजताच पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा करून अपघाची नोंद केली असून त्यानी सर्व मार्गानी तपास करीत आहेत.
सुरज च्या अपघातात मृत्यु झाल्याचे समजताच गावात सन्नाटा पसरला आहे.आपल्या मुलाचा मृतदेह पाहून त्याच्या भावासह आई वडीलांनी आक्रोश केला.सुरज हा गावात वेल्ड़ींगचा व्यवसाय करायचा.तो कष्टाळू आणि मनमिळाऊ स्वभवाचा होता.या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांच्यासह त्याचे सहकारी करीत आहेत.