प्रेस मीडिया लाईव्ह :
जयसिंगपूर शहरामध्ये आंबेडकर सोसायटी येथील वैशाली बौद्ध विहार या ठिकाणी बौद्ध समाजातील बांधवांनी 33 वी बौद्ध धम्म परिषद उत्साहात साजरी केली. या धम्म परिषदेला महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे आले होते कलाकृतींचे विविध स्टॉल लागलेले होते .
जयसिंगपूर व आसपासच्या गावातील हजारो लोक या धम्म परिषदेत सामील झाले होते धम्म परिषदेमध्ये महत्त्वाची एक गोष्ट बघण्यास मिळाली ती म्हणजे सामाजिक सलोखा जोपासणारे संघटन युनायटेड मुस्लिम फोरम यांच्याकडून 1000 पाण्याच्या बाटल्यांचे वाटप बौद्ध धम्म परिषदेला येणाऱ्या लोकांना करण्यात आले. याकरिता हाजी मुबारक फरास, युसुफ तासगावे, असलम बानदार, हाजी मोहम्मद खान सनदी, हाजी अल्लाउद्दीन कोतवाल, दस्तगीर बागवान, सुलेमान सय्यद, सलीम शेख, हाफिज शोएब डॉ. मुनकीर मुजावर समीर मुल्ला रशीद अत्तार, खलिफ अरिफ युनायटेड मुस्लिम फोरम चे कार्यकर्ते उपस्थित होते.दिवसभरात विविध व्याख्याने व विविध कार्यक्रम यांनीही धम्म परिषद उत्साहात साजरी झाली झाली .