कॉंग्रेसचे भ्रष्टाचारी खासदार धीरज साहूं विरोधात इचलकरंजी भाजप महिला आघाडी आक्रमक, प्रतिमेला जोडो मारो करून निषेध


प्रेस मीडिया लाईव्ह 

इचलकरंजी आज दि.११/१२/२०२३ -खासदार साहू यांच्याकडून ३००कोटी इतक्या मोठ्या प्रमाणात काळा पैसा जप्त झाला आहे. कॉंग्रेसच्या खासदार धीरज साहूंविरोधात भाजप महिला आघाडी आक्रमक, जोडो मारो करुन निषेधाच्या घोषणा देत निषेध इचलकरंजी  कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घरातून आयकर, ईडी विभागाने तीनशे कोटींहून अधिकची रोकड जप्त केली आहे. याविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून साहू यांच्यासोबत कॉंग्रेसच्या भ्रष्टाचारी नेत्यांविरोधात इचलकरंजी विधानसभा भाजपा शहर कार्यलय समोर भाजपा हातकणंगले लोकसभा संयोजिका सौ सोनाली मगदुम, यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तसेच कबनूर  चौकात यांच्याच नेतृत्वात काँग्रेस खासदार धीरज साहू यांचा निषेध करण्यात आला.

खासदार साहू यांच्याकडून इतक्या मोठ्या प्रमाणात काळा पैसा जप्त झाला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे ‘मोहब्बत की दुकान’ असल्याचे म्हणतात. प्रत्यक्षात कॉंग्रेस पक्ष हा ‘भ्रष्ट मोहब्बत की दुकान’ असल्याचा निषेध व्यक्त करत आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी लावला. यावेळी. हातकणंगले लोकसभा संयोजिका सौ सोनाली मगदुम, जिल्हा उपाध्यक्षा सौ अश्विनी कुबडगे, जिल्हा उपाध्यक्षा सौ विजया पाटील,शहराध्यक्षा पुनम जाधव , सौ निता भोसले निर्मला मोरे,सौ पुनम भोसले, शशिकला इंगवले सरला घोरपडे,नागुताई लोढे, निर्मला कुंरुदवाडे, अलका विभुते, संगिता कांबळे, शबाना शहा, संजिवनी जगदाळे, सुनिता चौगुले, भाजपा शहराध्यक्ष पै अमृत भोसले, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड,तसेच राजू भाकरे, दिपक पाटील, उत्तमसिंह चव्हाण, उमाकांत दाभोळे, अरविंद चौगुले, मनोज तराळ, प्रमोद काड्डाप्पा

सर्व आंदोलनांमध्ये भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते

Post a Comment

Previous Post Next Post