प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता. ६ समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
या महामानवांच्या प्रतिमाना अन्वर पटेल व पांडुरंग पिसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रसाद कुलकर्णी यांनी डॉ. आंबेडकर व क्रांतीसिंह यांच्या विचाराची आज मोठ्या प्रमाणात गरज आहे हे स्पष्ट केले. यावेळी अजितमामा जाधव , राजन मुठाणे, प्रा.विजय जालिहाळे,शकील मुल्ला ,डी. एस. डोणे,शहाजी धस्ते ,सौदामिनी कुलकर्णी, प्रा.डॉ.एफ.एम. पटेल,नंदकिशोर जोशी, अनिल पचिंद्रे, नंदा हालभावी, अश्विनी कोळी, अशोक मगदूम, मनोहर कांबळे,सचिन पाटील, ईश्वरा ढगे, मनोहर जोशी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.