प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रतिनिधी :
इचलकरंजी : हाजी मिरासाहेब गैबान सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित, इकरा उर्दू सेमी इंग्लिश स्कूल शहापूर इचलकरंजी येथे 11 वे वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाले. क्रीडा महोत्सव प्रसंगी शाळेचे संस्थापक चेअरमन मा.श्री.लतिफ मिरासाहेब गैबान साहेब, शाळेचे संचालक हाजी युसुफ तासगावे साहेब, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब मुजावर चाचा, प्रा.सय्यद सर, जमीर पटेल व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थ्यांनी सांघिक व वैयक्तिक खेळांचे अतिशय सुंदर रित्या सादरीकरण केले. त्यामधे खो खो, कबड्डी, धावणे, रीले, मुलींसाठी लंगडी, लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळांचा ही समावेश करण्यात आला होता. सांघिक खेळामध्ये विजयी झालेल्या संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
शाळेचे संचालक हाजी युसुफ तासगावे साहेब यांनी मुख्याध्यापक मा.श्री. बासिदअली जमादार सर आणि शाळेतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले. तसेच त्यांच्या कार्यासाठी शुभेच्या दिल्या. शाळेतील सहाय्यक शिक्षक मा.श्री. अकीक कोनकेरी यांनी खेळा विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुफियान पटेल यांनी केले.