श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती, श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळ, इचलकरंजी.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी - श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती व श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळ इचलकरंजी यांच्या वतीने पंचगंगा वरदविनायक मंदीर परीसर इचलकरंजी येथे दि. ०२/०१/२०२४ ते १०/०१/२०२४ पर्यंत १०८ कुंडीय श्री गणपती महायज्ञाचे सर्वांचे कल्याण, सुख-शांती व मनोइच्छा पूर्ण होणेसाठी आयोजन करण्यात आले आहे. हा महायज्ञ व इतर सर्व धार्मिक कार्यक्रम राजस्थानचे थोर संत श्री सितारामदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

या १०८ कुंडीय श्री गणपती महायज्ञाबरोबरच सोमवार दि. ०१/०१/२०२४ रोजी दुपारी ठिक ३.०० वाजता लक्ष्मीनारायण मंदीर झेंडा चौक येथून भव्य "कलश यात्रा" निघणार आहे. या कलशयात्रेचे नियोजन शिवराणा गौ सेवा शाममित्र परिवार व बरसाणा महिला मंडळ यांच्यावतीने करण्यात येणार आहे. मंगळवार दि. ०२/०१/२०२४ ते बुधवार दि. १०/०१/२०२४ पर्यंत या १०८ कुंडीय श्री गणपती महायज्ञाचे सकाळी ८.०० ते दु. ३.०० या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. ०२/०१/२०२४ त शनिवार दि. ०६/०१/२०२४ पर्यंत "गणपती महापुराण" व गणपती महिमा दुपारी ३.३० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत या वेळेत संपन्न होणार आहे. याचे नियोजन महेश हौसींग सोसायटी महिला मंडळ इचलकरंजी हे करणार आहेत. बुधवार दि. ०३/०१/२०२४ ते शनिवार दि. ०६/०१/२०२४ या दिवशी पंडीत अक्षयजी अनंतजी गौड यांच्या गोड स्वरामध्ये रात्रो ०८.०० ते १०.०० पर्यंत "संगितमय नानीबाई का मायरा" हा कार्यक्रम होत आहे. सदर कार्यक्रमाचे व्यवस्थापन कापडमार्केट महिला मंडळ, इचलकरंजी हे करणार आहेत. रविवार दि. ०७/०१/२०२४ रोजी माहेश्वरी महिला मंडळ व राधाकृष्ण महिला मंडळ यांचेमार्फत सायंकाळी ५.३० वाजलेपासून - "भव्य पंचगंगा दिप महोत्सव" साजरा होणार आहे.

सोमवार दि. ०८/०१/२०२४ रोजी गायत्री महिला मंडळ, इचलकरंजी यांचे वतीने सकाळी ११.०० ते १२.०० वाजेपर्यंत "चुनरी मंगल महोत्सव" संपन्न होत आहे. बुधवार दि. ०३/०१/२०२४ ते मंगळवार दि. ०९/०१/२०२४ या दिवशी सकाळी ७.०० वाजना आर्ट ऑफ लिव्हींगचे विनायक मुरदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली "योग व ध्यान" शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रविवार दि. ०७/०१/२०२४ ते मंगळवार दि. ०९/०१/२०२४ सायंकाळी ७.०० वाजता श्री ऋषी देवव्रतजी आर्ट ऑफ लिव्हींगद्वारा "ज्ञान चर्चा" होणार आहे.

मंगळवार दि. ०२/०१/२०२४ ते दि. ०९/०१/२०२४ रोजी वृंदावन येथून येणाऱ्या सुरदासांचे अखंड किर्तन आयोजीत करण्यात आले आहे त्याची व्यवस्था केसरवाणी ग्रुप हे पहाणार आहेत.

रविवार दि. ०७/०१/२०२४ ते सोमवार दि. ०८/०१/२०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता सनातन संस्थेच्या वतीने विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे याचे नियोजन इचलकरंजी तहसिल माहेश्वरी महिला मंडळ करणार आहे. तसेच मंगळवार दि. ०२/०१/२०२४ पासून मंगळवार दि. ०९/०१/२०२४ "गोमातेचे पूजन व गो दान" हा नित्य कार्यक्रम होणार आहे. दि. ०६/०१/२०२४ ते ०७/०१/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. "श्रीमद्भगवतगीता १८ वा अध्याय" सांगण्यात येणार आहे. बुधवार दि.१०/०१/२०२४ रोजी संत संमेलनाने व यज्ञाच्या पूर्णाहूतीने कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या सर्व कार्यक्रमाचे नियोजन श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती, इचलकरंजी व श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळ, इचलकरंजी यांच्या वतीने करण्यात येत आहे. गायत्री सेवा मंडळ, जय जगदंबा सत्संग मंडळ, त्यागी भवन, करंट मारुती सत्संग मंडळ, माय फाउंडेशन व इचलकरंजीतल्या अनेक धार्मिक संघटना या यज्ञकार्य यशस्वीतेसाठी सहकार्य करीत आहेत. दि. ०२/०१/२०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता श्री श्री श्री १००८ डॉ. जगद्गुरु चन्नसिध्दराम पंडीताराध्य शिवाचार्य, महास्वामीजी श्रीशैल आंध्रप्रदेश हे उपस्थित राहून भक्तांना आशिर्वाद देणार आहेत. तसेच या यज्ञ कार्यक्रमासाठी जगद्गुरु श्री श्री विद्यानृसिंह भारती शंकराचार्य करवीर पीठ, कोल्हापूर, श्री वाईपीठाचे महादेव शिवाचार्य स्वामीजी, नूल मठाचे मठाधिपती श्री गुरु सिध्देश्वर स्वामीजी, संकेश्वर येथील निडसोसी मठाचे मठाधिपती प.पू. श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी, म्हैशाळ संस्थांचे डॉ. शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी, यज्ञाचार्य पंडीत चिरंजीवजी शास्त्री, पंडीत अक्षयजी अनंतजी गौड, संवीत कैलाशचंद्रजी जोशी इ. मान्यवर साधुसंत-महंत उपस्थित राहणार आहेत.

तरी या सर्व धार्मिक कार्यक्रमात इचलकरंजी परिसरातील नागरिकांनी व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाचे अशोकराव स्वामी, बाळासाहेब जांभळे, द्वारकाधीश सारडा व सनातन ज्ञानपीठ प्रचार समितीचे गोविंदजी बजाज, राजेंद्र बोहरा, भरत जोशी, हरिष सारडा, शाम काबरा, गोविंद सोनी व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post