इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील रिकामा भूखंड धारक व मिळकत धारकांना आवाहन



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील रिकामा भूखंड धारक व मिळकत धारकांना आवाहन करणेत येते की, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चा कलम १२८ व अनुसूची ड प्रकरण ८ (कराधान नियम) नियम ३९.४० अन्वये सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची देयके लागू करण्यात आलेली आहेत.

ज्याअर्थी अनेक रिकामा भूखंड धारक वास्तव्यास बाहेर गावी आहेत, अथवा अनेक रिकामे भूखंडाचे परस्पर विक्री करून हस्तातरण केलेले आहे तसेच संबंधितांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक उपलब्ध होत नसलेने कर देयके पाठविण्यात अडचण निर्माण झालेली आहे. त्याअर्थी, ज्या रिकामा भूखंड धारक व मिळकत धारकांना अद्यापही कराची मागणी देयके मिळालेली नाहीत त्यांनी इकडील कर विभागाकडे येऊन आपली देयके स्वीकारून कराचा भरणा तातडीने करावा. अन्यथा सदर जाहीर आवाहनाद्वारे कराची देयके आपणास मिळालेली आहेत असे समजण्यात येईल व दरमहा २% प्रमाणे शास्ती (दंड) लावण्याची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी

तसेच ज्या मिळकत धारकांनी अद्यापही घरफाळा / पाणीपट्टी व रिकामा भूखंडाची कराची रक्कम भरणा केलेली नाही त्यांनी माहे डिसेंबर २०२३ अखेर कराचा भरणा करावा अन्यथा दरमहा २% प्रमाणे शास्ती (दंड) आकारण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी, तरी सर्व मिळकत धारकांनी घरफाळा व पाणीपट्टी मागणी देयकाची रक्कम भरावी तसेच आपला मोबाईल नंबर नोंद करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून करणेत येत आहे.


        

Post a Comment

Previous Post Next Post