आय.जी.एम. रुग्णालय मधील अद्ययावत सुविधा त्वरित सुरू करण्यास भारतीय जनता पार्टीला यश -

 अद्ययावत सुविधांचा लाभ घ्यावा - पै.अमृतमामा भोसले- शहराध्यक्ष



प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी : प्रतिनिधी:

इचलकरंजी व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनासाठी आधारवड, संजीवनी ठरलेले आय. जी. एम. हॉस्पिटलमधील सिटीस्कॅन व अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभाग बंद होते ते तात्काळ सुरू करण्यात यावा या मागणीचे निवेदन आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले व त्यांच्या शिष्टमंडळाने आय. जी. एम. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.एम.जे जमादार यांना देण्यात आले. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आहे निदर्शने करण्यात आली.

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय (आय. जी. एम) हॉस्पिटल अत्याधुनिक सुविधेसाठी तत्कालीन आमदार भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर यांनी युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री असलेले विद्यमान उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून सर्व सामान्य जनतेला अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी व आय. जी. एम. हॉस्पिटल अद्यावत करण्यासठी प्रयत्न केले. त्याचेचे फलित म्हणून आज आय. जी. एम. हॉस्पिटल अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेसाठी तयार आहे. सर्व सामान्य जनतेसाठी महायुती सरकारने देऊ केलेल्या हॉस्पिटलमधील शस्त्रक्रिया विभाग, २४ बेडचे अतिदक्षता विभाग,  सिटी स्कॅन मशीन, लहान मुलांचे अतिदक्षता विभाग, एक्सरे मशीन  या अत्याधुनिक मशनरीचा लोकार्पण होऊ न शकल्यामुळे त्याचा वापर आय. जी. एम. प्रशासनाकडून होत न्हवते. त्यामुळे सर्व सामान्य गोरगरीब जनतेला वैद्यकीय सेवेपासून वंचित राहवे लागत होते.



 या बाबतची सतत तक्रारारी होत होत्या. तथापि उद्घाटना अभावी सर्व सामान्य जनतेला उपचाराच्या सुविधेपासून वंचित ठेवने हे कितपत योग्य आहे ? असे आय. जी. एम. प्रशासनाला धारेवर धरत, बंद का असलेबाबत विचारणा करून प्रशासनाचा निषेध करून आय. जी. एम. प्रशासनाविरोध घोषणाबाजी करण्यात आला. या आंदोलनाची दखल घेत वरीष्ठ अधिकारी व वैद्यकीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्याशी दूरध्वनीद्वारे भाजपा शहराध्यक्ष पै. अमृत भोसले व डॉ. जमादार यांची चर्चा झाली. नंतर सिटीस्कॅन सेवा, अतिदक्षता विभाग सेवा तात्काळ चालू केली तसेच अन्य वैद्यकीय सुविधेतील मशिनरी व इतर सुविधा लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले व त्यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने बंद असलेल्या सुविधा जनतेसाठी सुरु करण्यात आल्या. यावेळी शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले यांनी शहरवासियांना या रुग्णालयातील सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. 

तरी,उर्वरित रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा सर्व सामान्य जनतेसाठी आठ दिवसात सुरू झाल्या पाहिजेत अशा मागणीचे निवेदन आय जी.एम. प्रशासनाला देऊन सर्व सुविधा सुरु न केल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने आय जी.एम. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन करण्यात येईल व पुढील होणा-या परिणामास आय जी. एम. प्रशासन जबादार राहील, याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले 

यावेळी स.गां.नि.योजना अध्यक्ष अनिल डाळ्या, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मनोज हिंगमिरे, युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बुगड, उमाकांत दाभोळे, राजेंद्र पाटील, आण्णा आवळे, प्रवीण पाटील, दिपक पाटील, जहांगीर पटेकरी, बाबासाहेब कोरे, म्हाळसाकांत कवडे, अमित जावळे, राजेश रजपुते, उत्तम विभूते, प्रदिप मळगे, सलीम शिकलगार, मनोज तराळ, अरविंद चौगुले, नामदेव सातपुते, प्रकाश खरगे, शिवाजी पन्हाळकर, अर्जुन मोरे, गणेश पिसके, विपुल खोत, राहुल पवार, अनिस म्हालदार, मयूर दाभोळकर, राजू भाकरे, शिवानंद रावळ, मारुती पाथरवड, महिला आघाडीच्या शबाना शहा, त्याच बरोबर युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post