प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी येथे संसदे मध्ये 146 खासदारांना निलंबनाच्या निषेधार्थ गांधी पुतळ्याजवळ सर्व पक्षीय इंडिया आघाडी तर्फे जोरदार निदर्शन करण्यात आले.
या वेळी सर्व पक्षाचे प्रमुख यांनी या ठिकाणी मोदी सरकारचा धीतकार केला आणि मोदी शहा चले जाओ अशा घोषणा देऊन हा परिसर दणाणून सोडला आणि या जुलमी सरकारला राजीनामा द्या अशा घोषणा देण्यात आल्या
या मोर्चा मध्ये शशांक बावचकर , मदन कारंडे , सदा मलाबादे , दत्ता माने प्रसाद कुलकर्णी , सयाजी चव्हाण , युसुफ तासगावे , प्रताप होगाडे , बजरंग लोणारी , बाबासाहेब कोतवाल , राहुल खंजीरे, राष्ट्रवादी अनेक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते . काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी, माकाप पक्ष आम आदमी पार्टी , इचलकरंजी धर्मनिरपेक्ष सर्व पक्षीय मंडळी उपस्थित होते.