प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी आज मंगळवार दिनांक १२ डिसेंबर रोजी उपायुक्त डॉ प्रदीप ठेंगल, तैमूर मुलाणी, सोमनाथ आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीत प्रामुख्याने केंद्र शासनाच्या अमृत दोन अंतर्गत मोठे तळे सुशोभीकरण, सुळकुड पाणी पुरवठा योजना,पी.एम.ई.बस, स्वच्छ भारत अभियान, पी.एम.श्री. स्कुल विकास योजना, डि. पी.रोड तसेच राज्य शासनाच्या नगरोत्थान राज्य स्तर, रमाई घरकुल योजना, मुलभूत सोयी सुविधा अंतर्गत ड्रेनेज, सक्शन कम जेटिंगसह पाणी पुनर्वापर सिस्टीम मशीन खरेदी करणे, सोलर हायमास्ट, रविंद्रनाथ टागोर वाचनालय दुसरा मजला, नालंदा अकादमी, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कार्डियाक ॲम्बुलन्स, डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना, बी.ओ.टी.तत्वावर करणेची कामे इत्यादी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यामध्ये ज्या योजना सुरू आहेत त्याचा आढावा घेऊन सदर कामे गुणवत्ता पुर्वक करणेच्या सुचना दिल्या तसेच ज्यायोजनांचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत त्यांचा शासन स्तरावर पाठपुरावा करणेच्या सुचना संबंधित विभागप्रमुख यांना दिल्या.
सदर बैठकीस सहा. आयुक्त केतन गुजर, वित्त व लेखा अधिकारी विकास खोळपे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, सहायक संचालक नगररचना प्रशांत भोसले, उप अभियंता संदीप जाधव,उप शहर अभियंता राधिका हावळ, संगणक अभियंता संतोष पवार, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, सहा नगररचनाकार नितिन देसाई आदी उपस्थित होते.