प्रेस मीडिया लाईव्ह :
संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेचे आयोजन करणेत आले आहे. या स्पर्धेत इचलकरंजी महानगरपालिकेने सुद्धा सहभाग नोंदविला आहे.
काही दिवसांपूर्वी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी पुणे विभागीय आयुक्त तथा मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा समितीचे अध्यक्ष सौरभ राव यांच्या समोर इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने तयार करणेत आलेल्या पी.पी.टी.चे स्लाईडशोच्या माध्यमातून सादरीकरण केले होते.
या स्पर्धेच्या अनुषंगाने इचलकरंजी शहराचे परिक्षण करणेसाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सह.आयुक्त तथा सक्षम शहर स्पर्धा समिती सदस्य पुनम मेहता यांचेसह त्यांच्या पथकाने आज शुक्रवार दि.८ डिसेंबर रोजी इचलकरंजी शहरास भेट दिली. भेटी दरम्यान त्यांनी शहरातील वारसा स्थळांची तसेच विविध ठिकाणची पाहणी करून शहरातील ऐतिहासिक वारसा स्थळांची महानगरपालिकेकडून होत असलेल्या जपनुकी बाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त यांचे दालनात सह. आयुक्त पुनम मेहता यांचे स्वागत आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी वस्त्र नगरीची ओळख असलेल्या नॅपकीन बुके आणि 'इचलकरंजी' हे इचलकरंजी शहराच्या इतिहासाची माहिती असलेले पुस्तक देऊन केले.
याप्रसंगी उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, तैमूर मुलाणी, सोमनाथ आढाव, सहा. आयुक्त केतन गुजर, कामगार अधिकारी विजय राजापुरे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार मुख्य लेखापरीक्षक आरती पाटील- खोत, सहा. संचालक नगररचना प्रशांत भोसले आदी उपस्थित होते.