प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी. येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचलकरंजी शहराच्या वतीने मा प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी सो आय जी एम उपजिल्हा रुग्णालय इचलकरंजी शहर यांना निवेदन देण्यात आली या निवेदनामध्ये आय जी एम मधील होणाऱ्या रुग्णांची हेळसांडपणा आय सी यू मध्ये ३४ पैकी २४ बेड बंद आहेत व १० बेड चालू आहेत तसेच सर्जन डॉक्टरांची नेमणूक का करण्यात आली नाही व पिण्याच्या पाण्याची सोय अद्यापही सुरू नाही आणि आणि दुपारी ४_00 नंतर ओ पी डी मध्ये डॉक्टर उपलब्ध नसतात आमचे शिष्ट मंडळ मनसे वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी श्री जमादार साहेब यांना विचारणा केली असता त्याने पुरेसा स्टाफ उपलब्ध नसल्याने कारण दिले व स्टाफ नेमणूक करण्याचे अधिकार मला नाहीत असे उत्तर अधिकारी यांनी दिले त्यानंतर मनसेकडून एक जानेवारी 2024 पर्यंत सर्व सुविधा सुरळीत करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असे सांगितले.
यावेळी पुंडलिक भाऊ जाधव रवी गोंधळ राजेंद्र निकम प्रतापराव पाटील शहाजी भोसले मनोहर जोशी महेश शेंडे सचिन दरीवे रोहित कोटकर अर्चना धामोडे दिलीप जाधव प्रतीक सावंत रमेश फसलादे अरुण घोलपे शाम विशाल मारुती वंजीरे आदी मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते*