सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या जैव वैद्यकीय कचरा टाकले बद्दल शहरातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकास रु.५००० दंड



प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी :   शुक्रवार दि.१५ डिसेंबर रोजी इचलकरंजी शहरातील वॉर्ड नं. ११ मधील वखार भाग येथे  जैव वैद्यकीय कचरा टाकलेचे निदर्शनास आलेने सदर प्रभागातील स्वच्छता निरीक्षक करण लाखे आणि सुरज पांगिरे यांनी  जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता, त्या ठिकाणी जैव वैद्यकीय कचरा सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर टाकलेचे दिसून आले. 

या परिसरात पाहणी केली असता सदरचा जैव वैद्यकीय कचरा डॉ. प्रविण मोरे यांच्या स्पंदन हॉस्पिटल मधून टाकलेचे निष्पन्न झालेने आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या आदेशानुसार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ सुनिलदत्त संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित वॉर्डाचे स्वच्छता निरीक्षक यांनी डॉ. प्रविण मोरे (स्पंदन हॉस्पिटल) यांचेवर नियमा प्रमाणे दंडात्मक कारवाई करुन रुपये ५०००/- इतका दंड वसूल केला.तसेच यानंतर असे वर्तन परत घडलेस फौजदारी कारवाई करणेत येईल अशा सक्त सुचना देण्यात आलेल्या आहेत.




          

Post a Comment

Previous Post Next Post