प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी: प्रतिनिधी :
इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी संभाजी गुरव यांची तर उपाध्यक्षपदी बसवराज कोटगी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच शिवानंद रावळ यांची सचिवपदी तर महावीर चिंचणे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.
इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत सदर निवडी एकमताने व सर्व संमतीने करण्यात आली अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष धर्मराज जाधव होते.
यावेळी रामचंद्र ठिकणे, भाऊसाहेब फास्के ,अनिल दंडगे, चिदानंद आलुरे, धर्मराज जाधव, पंडित कोंडेकर, बाबासाहेब राजमाने, अतुल आंबी, हुसेन कलावंत, सुभाष भस्मे ,शीतल पाटील, महेश आंबेकर , डॉ पांडुरंग पिळणकर , छोटुसिंग रजपूत, इराण्णा सिंहासने, विजय चव्हाण आदी सदस्य उपस्थित होते.