इचलकरंजी : चालका विना शववाहिका बंद

 शववाहिका सेवा सत्वर उपलब्ध करुन द्यावी -भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : प्रतिनिधी :

इचलकरंजी- ता.३१ , भाजपा युवा मोर्चा इचलकरंजी यांच्यावतीने प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अत्याधुनिक शववाहिकेची मागणी करण्यात येणार 

इचलकरंजी शहराची लोकसंख्या सुमारे चार साडेचार लाखापर्यंत पोहोचली आहे ही लोकसंख्या पाहता महापालिकेच्या वाहन विभागाकडे चार ते पाच शववाहिका का असणे गरजेचे आहे तरीही महापालिकेडे चालक उपलब्ध नसल्याने मृत पावलेल्या नातेवाईकांना गाडीची तीन चार तास वाट पाहावी लागते

महापालिकेकडे सध्या दोन शववाहिका आहेत त्यातील एक तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांच्या फंडातून सण 2012/ 13 ला दिली गेलेली आहे तर दुसरी गाडी कोविड काळात तत्कालीन पालकमंत्री 2020/21 यांच्या फंडातून दिले गेलेले आहे, शहरात सरासरी रोज चार ते पाच मृत्यू पावणाऱ्यांची संख्या आहे ही वस्तुस्थिती असून चालक नसल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात येते हि बाब दुर्दैवी आहे तरी ताबडतोब चालक भरती करून शववाहिका सेवा सुरळीत करावी अशियाचे निवेदन महापालिका उपायुक्त श्री तैमुर मुलानी यांची भेट घेऊन भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिले

यावेळी शिष्टमंडळ चर्चा करताना उपायुक्त मुलांणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना देऊन लवकरच चालक उपलब्ध करून शववाहिका सेवा सुरळीत चालू करून देण्याचे आश्वासन दिले

निवेदन देताना यावेळी शिष्टमंडळ मध्ये युवा शहराध्यक्ष जयेश बुगड, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक विठ्ठल चौपडे, उमाकंत दाभोळे, हेमंत वरूटे मनोज तराळ, प्रविण बनसोडे, नितीन पडीयार,विराज इंगळे सुरज आडेकर विशाल पायल नेताजी लोखडे वैभव लिगाडे,अली खान भाजपा पदाधिकारी तसेच युवा मोर्चा कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post