इचलकरंजी शहरात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा जिम्नॅशियम मैदान येथे मोठ्या उत्साहात शुभारंभ-



 प्रेस मीडिया लाईव्ह :

   इचलकरंजी :  भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लक्ष इच्छित  लाभार्थ्यांच्या पर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित करण्यात आली आहे. विकसित भारत संकल्प यात्रा इचलकरंजी शहरामध्ये दि. २२ डिसेंबर ते दि.२७ डिसेंबर या दरम्यान इचलकरंजी शहरातील विविध १२ ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. यासाठी शासनाकडून जनजागृती करणेसाठीची सुसज्ज अशी व्हॅन या कालावधीत इचलकरंजी शहरासाठी उपलब्ध करणेत आलेली आहे.या यात्रेमध्ये महानगरपालिकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या PM स्वनिधी, PMAY, स्वच्छ भारत मिशन, PM ई-बस सेवा आणि अटल मिशन (अमृत) योजना तसेच शासनाच्या अन्य  विभागांमार्फत दिल्या जाणाऱ्या उदा.आभा कार्ड, आयुष्यमान भारत , उज्वला गॅस इत्यादी योजनांबावत जनजागृती आणि त्याचा लाभ देण्यासाठी नोंदणीची सुविधा असणार आहे. 

आज इचलकरंजी शहरात या विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ शहरातील जिम्नॅशियम मैदान येथे आमदार प्रकाशराव आवाडे आणि महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते तसेच उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, माजी नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत करणेत आला.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी केले.तसेच सुत्र संचालन विजय राजापुरे यांनी केले.

          याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आमदार प्रकाशराव आवाडे यांनी या यात्रेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन या यात्रेच्या माध्यमातून  महानगर पालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती देऊन जास्तीत जास्त नागरिकांनी सदर यात्रा आपल्या परिसरात आल्यानंतर आपल्या घरा नजीकच्या  ठिकाणी उपस्थित राहून अद्यापही या योजनांचा लाभ घेतला नसेल त्यांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन केले. याचवेळी  प्रधानमंत्री आवास योजना आणि पी.एम.स्वनिधी अंतर्गत उपस्थित लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. त्याचबरोबर उपस्थित नागरिकांनी

सदर ठिकाणी असलेल्या विविध योजनांचा लाभ घेतला.

      सदर विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रारंभ इचलकरंजी शहरातील कागवाडे मळा, जिम्नॅशियम मैदान येथुन झालेला असुन यानंतर खालील प्रमाणे सदर यात्रेचे आयोजन करणेत आले आहे.


  विकसित भारत संकल्प यात्रेची इचलकरंजी शहरातील ठिकाणे खालील प्रमाणे.

 १. कागवाडे मळा जिम्नॅशियम मैदान

 दि.२२/१२/२०२३ रोजी 

सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत.

२) इंदिरा हौसिंग सोसायटी स्वामी अपार्टमेंट लगत म.न.पा. ओपन स्पेस 

      दि.२२/१२/२०२३ रोजी 

   दुपारी २ ते सायंकाळी ६ पर्यंत.

३) रिंग रोड (शाळा क्र. ३८, थोरात चौक)

दि. २३/१२/२०२३ रोजी 

सकाळी ९ ते  दुपारी १ पर्यंत 

४) शहापूर चौक शाळा क्र. १४

    दि.२३/१२/२०२३ रोजी 

   दुपारी २ ते सायंकाळी ६ पर्यंत 

५) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ) राजाराम स्टेडियम परिसर

दि.२४/१२/२०२३ रोजी 

सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत 

६. छत्रपती शाहू महाराज पुतळा ( शाळा क्र.३३) परिसर

दि. २४/१२/२०२३ रोजी 

दुपारी २ ते सायंकाळी ६ पर्यंत 

७)सोलगे मळा (शाळा क्र.३०)

 दि.२५/१२/२०२३ रोजी 

  सकाळी ९ ते दुपारी १

८. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर (L.I.C. इमारतीच्या लगत)

   दि.२५/१२/२०२३ रोजी 

   दुपारी २ ते सायंकाळी ६

९) महात्मा गांधी पुतळा ते कल्लाप्पाण्णा आवाडे  बॅंक

(शाळा क्रमांक ०२)

  दि.२६/१२/२०२३ रोजी 

   सकाळी ९ ते दुपारी १

१०) डि.के.टी.ई.चौक, (डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल)

   दि‌२६/१२/२०२३ रोजी 

   दुपारी २ ते सायंकाळी ६

११) प्रकाश -उत्तम टॉकीज

    (म.न.पा.मार्केट परिसर )

   दि.२७/१२/२०२३ रोजी 

    सकाळी ९ ते दुपारी १

१२) श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह चौक परिसर

   दि.२७/१२/२०२३ रोजी 

   दुपारी २ ते सायंकाळी ६

    सदर यात्रेच्या आजच्या शुभारंभ प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, ताराराणी शहराध्यक्ष प्रकाश दत्तवाडे,भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले, शहाजी भोसले, समाज विकास अधिकारी विकास विरकर, सहा लेखापरीक्षक दिलीप हराळे, नितिन सरगर, रफिक पेंढारी, शितल पाटील ,प्रविण बोंगाळे, रमजान नदाफ, बाळकृष्ण वनखंडे, शुभांगी जोशी, प्रदीप झमरी, दिलीप मुथा, म्हाळसाकांत कवडे, जयेश बुगड, वैशाली नायकवडे, योगिता दाभोळे, यांचेसह बॅंक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी, गावभाग नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक, आशा वर्कर्स आदी उपस्थित होते.



        

Post a Comment

Previous Post Next Post