प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी – राज्यातील चार विधानसभेचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये तीन राज्यात भाजपने आघाडी घेत विजयाकडे वाटचाल सुरु केलीय. त्यामुळे इचलकरंजीत भाजपा कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये (शिवतीर्थ) येथे साखरपेढी वाटून फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला यावेळी जल्लोष साजरा करताना जय श्रीराम,जय शिवाजी जय भवानी “हर हर मोदी, घर घर मोदी” मोदी अशा घोषणा देत शहरातून बाईक रॅली काढुन नागरिकांना साखर वाटून एकमेकांना शुभेच्छा देत आंनदउत्सव साजरा केला
यावेळी शहराध्यक्ष पै.अमृत भोसले यांनी सर्वांना शुभेच्छा देत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदीजी नेतृत्वात भाजपा 400 +पेक्षा जास्त खासदार निवडून येऊन पुन्हा एकदा केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी व सहयोगी मित्र पक्षांची सत्ता येणार असा विश्वास व्यक्त केला. या रॅलीमध्ये शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले, जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले,जि.उपाध्यक्ष मनोज हिंगमिरे, युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बुगड, उमाकांत दाभोळे, राजेंद्र पाटील, प्रसाद खोबरे,विनोद कांकाणी,दिलीप मुथा, दिपक पाटील,प्रविण पाटील,आण्णा आवळे,अमित जावळे,माजी महिला अध्यक्षा सौ.पुनम जाधव,सौ नीता भोसले, शबाना शहा, सौ.अलका विभुते,सौ.छाया तोडकर, महेश पाटील,म्हाळसाकांत कवडे, सागर कचरे, अतुल पळसुले, सुधीर पाटील, मनोज जाधव, नितीन पडीयार, अरविंद चौगुले,उत्तमसिंह चव्हाण, आप्पासाहेब गोकावी, सागर पाटील, शेखर पाटील, मारुती पाथरवड, प्रविण रावळ, प्रकाश खारगे, अविनाश लोखंडे, महादेव बडवे, राजु भाकरे, आशिष खंडेलवाल, जयवंत पाटील आदि भाजपा.युवा मोर्चा सर्व आघाडी चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.