हेर्ले येथे 17 डिसेंबर ते 24 डिसेंबर अखेर ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन, विविध धार्मिक कार्यक्रमांचे व दिंडीचे आयोजन



प्रेस मीडिया लाईव्ह पुणे  :

 हेरले प्रतिनिधी / संदीप कोले 

हेर्ले येथील श्री विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रविवार दि. 17 डिसेंबर ते रविवार दि. 24 डिसेंबर अखेर ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .या निमित्ताने गावात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दि. 17 डिसेंबर रोजी विश्वनाथ गुरव गुरव (चिमगाव )यांचे प्रवचन व किर्तन

सोमवार दि. 18 डिसेंबर रोजी रघुनाथ रोटे (मांडरे ) यांचे प्रवचन व किर्तन मंगळवार दि.  19 डिसेंबर रोजी गुरुवारी वास्कर फड प्रमुख गुरुवर्य देवव्रत्त रानोजी( पंढरपूर) यांचे प्रवचन व बाळासाहेब धर्माधिकारी (इचलकरंजी) यांचे कीर्तन

बुधवार दि. 20 डिसेंबर रोजी शशिकांत गुरव  (चौंडाळ)यांचे प्रवचन व कीर्तन

 गुरुवार दि. 21 डिसेंबर रोजी सौरभ निंबाळकर (हेर्ले ) यांचे प्रवचन व गजानन भगत (तारदाळ) यांचे कीर्तन 

शुक्रवार दि. 22 डिसेंबर रोजी संतोष सूर्यवंशी (बिरदेववाडी) यांचे प्रवचन व गणेश सुरुलकर ( सुरुलकर )यांचे कीर्तन 

शनिवार दि. 23 डिसेंबर रोजी गावातून भव्यदिंडी सोहळा व रात्री विष्णुपंत सुतार (दोनवडे) यांचे कीर्तन 

रविवार दि. 24 डिसेंबर रोजी सकाळी हनुमंतास अभिषेक , विष्णुपंत सुतार दोनवडे यांचे काल्याचे किर्तन ,दुपारी बारा ते तीन महाप्रसाद व तीन ते पाच दिंडी  सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

याशिवाय दररोज पहाटे चार ते पाच काकडा भजन ,सकाळी सात ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ, सायंकाळी साडेसहा ते साडेसात प्रवचन सेवा, व रात्री साडेनऊ ते साडे अकरा कीर्तन सेवा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांचा लाभ परिसरातील सर्व नागरिकांनी व भाविकांनी घ्यावा असे आव्हान ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post