प्रेस मीडिया लाईव्ह ;
हेरले प्रतिनिधी / संदीप कोले
हातकलंगले तालुक्यातील हेरले येथील कै. बाळासाहेब माने प्रसारक मंडप अंबप चे हेरले हायस्कूल येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या आयोजन केले होते. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन युवा उद्योजक सतीश शेंडगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक पी.आर. शिंदे होते. या वार्षिक क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी, खो-खो,व वैयक्तिक स्पर्धा लिंबू चमचा, संगीत खुर्ची,लांब उडी मारणे, 100 ते 200 मीटर धावणे, गोळा फेक अशा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे क्रीडा शिक्षक बी.आर. हुजरे, देसाई सर,एन. बी. माळी. हे पर्यवेक्षक होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यू. आर. पाटील यांनी केले तर के.बी.माने यांनी आभार मानले. या क्रीडा महोत्सव स्पर्धेमध्ये पाचवी ते दहावी मुला मुलींनी सहभाग घेतला होता. त्यावेळी हेरले हायस्कूल हेरले तील शिक्षक शिक्षिका, व कर्मचारी उपस्थित होते.