विश्वाच्या रत्नाला हेरलेच्या भीमसैनिकांनी केले अभिवादन



प्रेस मीडिया लाईव्ह :

 हेरले प्रतिनिधी / संदीप कोले 

 विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिदिनानिमित्त हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील भीमसैनिकांनी 5 डिसेंबर रोजी रात्री बारा वाजता कॅन्डल मार्च काढून आदरांजली वाहिली. व महिलांच्या हस्ते विश्वाच्या  रत्नाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.



 सहा डिसेंबर रोजी माळभाग येथे सायंकाळी सात वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ज्येष्ठ नागरिक, माजी मुख्याध्यापक विश्वास भाटे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. त्यानंतर धम्ममित्र अशोक कटकोळे यांनी पंचशील,विधायक पंचशील,बुद्ध पूजा बाबासाहेबांना आदरांजली वाहून निर्वाण दिनानिमित्त मार्गदर्शन करण्यात आले त्यावेळी संयुक्त बौद्ध समाजाच्या बौद्ध उपासक व उपासिका लहान मुले व मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post