कुमार विद्या मंदिर शिरोली नंबर 1 शाळेचे घवघवीत यश



प्रेस मीडिया लाईव्ह :

 हेरले प्रतिनिधी / संदीप कोले 

 हातकणंगले तालुक्यातील शिरोली येथे नागाव केंद्रांतर्गत झालेल्या सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत विद्या मंदिर शिरोली नंबर तीन शाळेने लहान गटात घवघवीत यश संपादन केले.शाळेने समूहनृत्य द्वितीय  ,समूहगीत तृतीय  व कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.क्रीडा स्पर्धेत लहान गटात मुलींच्या संघाने खोखो प्रथम क्रमांक व कबड्डी द्वितीय क्रमांक मिळविला. 100 मीटर धावणे मध्ये मुले व मुली यानी  तृतीय क्रमांक मिळविला.

   स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षण विस्तार अधिकारी जहांगीर मुल्लानी, केंद्रप्रमुख कृष्णात पाटील ,मुख्याध्यापक मधुकर पाटोळे ,राजेश जाधव,भिमा कांबळे व मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

    या विद्यार्थाना मुख्याध्यापक राजेश जाधव,गोरखनाथ पाटील,नईम अत्तार,नारायण पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यावेळी  विद्या मंदिर शिरोली नंबर तीन शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post