प्रेस मीडिया लाईव्ह :
हेरले प्रतिनिधी / संदीप कोले
हेरले ता. हातकणंगले येथील वंचित बहुजन आघाडी हातकणंगले तालुकाध्यक्ष आशपाक देसाई यांच्या उपस्थितीत हेरले शाखा बांधणी संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सामाजिक कार्यकर्ते मा. इब्राहिम खतीब (दाजी) यांची शाखा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडी हा सर्व सामान्यांचा पक्ष असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली,सर्व वंचित घटकांना सोबत घेऊन पक्षाचे काम करत राहीन असे मत इब्राहिम खतीब यांनी व्यक्त केले.
या बैठकीमध्ये राहुल धुळे, डेविड लोखंडे, ग्रामपंचायत सदस्या निलोफर खतीब व उर्मिला कुरणे,हेरले मुस्लिम समाजाचे अध्यक्ष इम्तियाज खतीब, दादासो काशिद यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे काम कशा पद्धतीने पुढे चालवाल याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन बाजीराव कटकोळे यांनी व आभार रणजीत कटकोळे यांनी मानले.
या बैठकीस हातकणंगले तालुका सचिव संताजी खाबडे, तालुका कोषाध्यक्ष नुरमोहम्मद खतीब, रवींद्र लोकरे ,युवराज कुरणे, सुरेश कदम, अमोल उलसार, सतीश कुरणे, किशोर लोखंडे, सुरज कोले, संजय कदम, प्रशांत खाबडे, फैजान जमादार,साहिल मोकाशी, जैनुल देसाई, काशीम नदाफ, अझरुद्दीन खानजादे,मुस्तफा खतीब,रमजान देसाई,खलील मुल्ला,प्रज्वल कुरणे, अनुप कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.