सावधान.. दुचाकी वर लिफ्ट देताय..चोरट्याने पळवले 33 हजार रुपये


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : रस्त्याने जाताना एका तरुणाने आपल्या दुचाकीवर अज्ञात तरुणाला लिफ्ट दिली, आणि थोड्या वेळ पुढे गेल्यानंतर पाठीमागे बसलेल्या त्या चोरट्याने दुचाकी स्वराच्या पाठीवर अडकवलेल्या पिशवीमधून 33 हजार रुपयांच्या रोकड हातोहात लंपास केली.कोल्हापूर शहरात हा प्रकार घडला.

लक्ष्मण नारायण कुंभार (वय ३३) राहणार सिद्धार्थनगर, कोल्हापूर हे 15 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता बिनखांबी गणेश मंदिर येथून टाऊन हॉलकडे आपल्या दुचाकीवरून निघाले होते.

यावेळी रस्त्यात त्यांनी एका अज्ञात तरुणास आपल्या दुचाकी वर लिफ्ट दिली. पाठीमागे बसलेल्या तरुणांनी लक्ष्मण यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या पाठीवर असणाऱ्या पिशवीतून 33 हजार रुपयांची रोकड काढून घेतली.थोड्या वेळाने कुंभार यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात जाऊन आपली रोकड चोरीस गेल्याचे सांगितले. त्यानुसार आज्ञात चोरट्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. दुचाकीवरून जाताना अशा प्रकारे कुणाला लिफ्ट दिली किंवा कोणाची लिफ्ट घेतली तरी चोरी, लुटमारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

..

Post a Comment

Previous Post Next Post