प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : इचलकरंजी परिसरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाली मिळाली असता पोलिसांनी गुटखा विक्री करणारा उमेश लायकर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील 1लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला जिल्हयात बेकायदेशीर व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी दिले होते.
त्या नुसार या पथकानी वेगवेगळी पथके तयार करून शोध मोहिम राबविली असता या पथकाला लायकर मळा येथे एका घरात गुटख्याचा साठा आणि विक्री होत असल्याचे समजले.तेथे जाऊन विक्री होत असलेल्या घरात छापा टाकून उमेश लायकर याला ताब्यात घेऊन त्या घरात साठा केलेला महाराष्ट्रात गुटखा विक्रीची बंदी असतानाही गुटखा ,सुगंधी तंबाखू आणि पान मसाला याचा साठा आढ़ळल्याने पोलिसांनी उमेश याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील 1लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.