आर्थिक वादातुन व्हीनस कॉर्नर परिसरात असलेल्या वृत्त वाहीनीच्या कार्यालयातून साहित्य चोरुन नेले.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- व्हीनस कॉर्नर येथे असलेल्या मातोश्री प्लाझा या बिल्ड़ींग मध्ये असलेल्या एका वृत्त वाहिनीचे (NEWS CHANNEL) कार्यालय असून त्यांच्यातील आर्थिक वादातुन रविवारी रात्रीच्या सु मारास या कार्यालयाचे कुलुप तोडून तिघां जणांनी साडेतीन लाख रुपये किमंतीचे साहित्य चोरुन नेल्याची तक्रार कल्पिता संजय कुंभार (वय .45.रा.रमणमळा).यांनी तिघांच्या विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी निशिकांत शामराव सहाय्य ,पत्नी मधुबाला निशिकांत सहाय्य ( कोल्हापुर). आणि अमित पावले (रा.शाहुपुरी). अशी संशीयताची नावे आहेत.अधिक माहिती अशी की,निशिकांत सहाय्य यांचे मातोश्री प्लाझा येथे दुसरया मजल्यावर दोन फ्लॅट आहेत.हे फ्लॅट कल्पिता कुंभार यांनी 2020 मध्ये भाडेत्तत्वावर घेऊन दरमहा 44 हजार रुपये भाडे देत होत्या.कुंभार यांनी त्या ठिकाणी वृत्तवाहीनीचे (NEWS CHANNEL) कार्यालय चालू केले होते.दरम्यान 2023 मध्ये निशिकांत सहाय्य यांच्या पत्नी मधुबाला या आजारी पडल्यामुळे निशिकांत यांनी कल्पिता कुंभार यांच्या कडून 10 लाख रुपये अमानत म्हणून जादा रक्कम घेतली .मात्र घाईगडबडीत त्यांना एंग्रिमेंट करता आले नाही असे कुंभार यांचे म्हणणे आहे.याच गोष्टीचा  फायदा घेऊन निशिकांत सहाय्य ,त्याची पत्नी मधुबाला आणि त्यांचा ओळखीचा अमित पावले अशा तिघांनी मिळून रात्रीच्या सु मारास जबरदस्तीने कार्यालयात घुसून आतील साहीत्य चोरुन नेल्याची फिर्याद कुंभार यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात दिली असता पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post